संपूर्ण माहिती शेवगा शेती

*शेवगा लागवड*

*1जमीन व हवामान*
➖➖➖➖➖➖➖➖➖
सम व दमट हवामानात या पिकाची वाढ चांगली होते. वाळूमिश्रित पोयट्याच्या तसेच डोंगर उतारावरील हलक्या माळरानाच्या भरास जमिनीतही या पिकाचे उत्पन्न येते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*२. लागवड :*
कमी पावसाच्या प्रदेशात जून – जुलै मध्ये तर जास्त पावसाच्या प्रदेशात ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये लागवड करावी. जमीन जर एकदम हलकी असेल तर शेवग्याची लागवड ही ६'x ६' ते ७'x ७' फुटावर करावी. तर मध्यम ते भारी जमिनीत शेवग्याची लागवड ८'x ८' ते १०'x १०' वर करावी. ज्यावेळेस शेवग्याची प्रत्यक्ष लागवड केली जाते. ती कमी -अधिक अंतरावर असते. त्यामुळे त्याचा फळधारणेवर विपरित परिणाम होतो. भारी काळ्या जमिनीत तिची जलधारणक्षमता अधिक असते. अशा जमिनीत लागवडीतील अंतर कमी झाल्यास आणि आवश्यकतेहून अधिक पाणी दिल्यास झाडाचा बुंधा लहान राहून फांद्याही बारीक जाडीच्या उंच अवास्तव वाढून फुलकळी कमी लागते. तर लागवडीतील अंतर जड झाल्यास अमर्याद फुटवयाची अवाजवी वाढ होते. फांद्या छाटणी न केल्याने उचं जातात व वांझा निघतात. तसेच जादा विशेषकरून नत्र व स्फूरद्युक्त अन्नद्रव्ये अनावश्यक फांद्या वाढीकडे खर्च होतात. त्यामुळे फळधरणेमध्ये अडचण निर्माण होते. लागवड १ ते २ फुट लांबीचे खुंट किंवा बियापासून रोपे तयार करून करता येते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*३. लागवडीनंतर घ्यावयाची काळजी:*
- झाडाची आळी खुरपून स्वच्छ करावी. तसेच दोन झाडांच्या ओळीत वखरणी करावी. म्हणजे तणांचा उपद्रव होणार नाही. 
- प्रत्येक झाडास १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र (१६५ ग्रॅम युरिया), ५० ग्रॅम स्फुरद ( ३१२ ग्रॅम सुपर फॉस्फेट) व ७५ किलो पालाश (१२० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. 
➖➖➖➖➖➖➖➖➖
*४. शेवग्याची छाटणी*
शेवग्याची छाटणी करण्याचे काम अत्यंत जिकीरीचे असते. शेवग्याची झाडे लागवडीनंतर १ || ते २ महिन्याची झाल्यावर २ ते २ || फुट उंचीची असताना शेंड्याची छाटणी करावी. त्यानंतर तो शेंडा पुन्हा जोम धरतोच, त्यामुळे पुन्हा काट करावा. म्हणजे ३ ते ४ फुटी वेगवेळ्या दिशेला निघतील. त्यानंतर मुख्य शेंडा आठवड्यातून २-३ वेळा न चुकता खुडावा आणि बाजूचे चौफेर फुटवे आठवड्यातून १ ते २ वेळा खुडावेत. म्हणजे अनावश्यक वाढ थांबून खोड, फांद्या जाड, झाडे डेरेदार होतील व त्यामध्ये आवश्यक अन्नसाठा तयार होईल. पुढे हा अन्नसाठा फुलकळी लागण्यास तसेच शेंगांचे पोषण करण्यास उपयुक्त ठरेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖

*५:शेवगा पीक संरक्षण*
➖➖➖➖➖➖➖➖➖
शेवगा पिकांमध्ये उत्तम शेंगा उत्पादनासाठी संजीवकांचा वापर आणि वेळेवर रोग व कीडनियंत्रण याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*६:पीक संजीवकाची फवारणी* 
पीक फुलोऱ्यात असताना फूलगळ टाळण्यासाठी व भरपूर शेंगा लागण्यासाठी नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एन.ए.ए.) ४ मि.लि. प्रति १० लिटर (१० पीपीएम ) याप्रमाणे फवारावे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*पीक संरक्षण*
१) *पाने खाणारी अळी*:

शा. नाव - स्पोडोप्टेरा लिट्यूरा
सुरवातीस कोवळ्या पानांवर प्रादुर्भावास सुरवात होते. हळूहळू ८ ते १० दिवसांत संपूर्ण पाने, कोवळे शेंडे व झाडाची कोवळी साल खाऊन टाकते. ही अळी खादाड असल्याने थोड्याच दिवसात संपूर्ण झाडाचे नुकसान करते. पानाच्या शिरावरील हरित द्रव्य खाते व पानाची जाळी तयार होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*नियंत्रण* : 
फवारणी प्रति लिटर पाणी
क्लोरपायरीफॉस (५०%) अधिक सायपरमेथ्रीन (५%) संयुक्त कीटकनाशक १ ते १.५ मिलि
किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन १ ते १.५ मिली
किंवा मोनोक्रोटोफॉस १ ते १.५ मिली
➖➖➖➖➖➖➖➖➖
२) *फळमाशी*:

*शास्त्रीय नाव* Gitona distiema
ही माशी कोवळ्या व तयार शेंगावर अंडी सोडते. ३ ते ४ दिवसांत अंड्यातून अळ्या बाहेर येतात. त्या शेंगात शिरून आतील गर खातात. शेंगातून डिंक व फेस बाहेर पडतो, शेंगा वाळून जातात व सडतात. याला अनेक शेतकरी डिंक्या म्हणून ओळखतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*नियंत्रण*
 : फवारणी प्रति लिटर पाणी
स्पिनोसॅड (४५ एससी) ०.३ ते ०.४ मिली.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*रोग*
१. *करपा*:

पानावर काळपट ठिपके येतात. फांद्या करपतात. पाने पिवळी पडून गळतात. करपा रोगामुळे झाडे पिवळे पडून करपल्यासारखे दिसते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*नियंत्रण* : 
फवारणी प्रति लिटर पाणी
कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा
मॅन्कोझेब १ ग्रॅम
➖➖➖➖➖➖➖➖➖
२. *मररोग (मुळकुज)*

पाण्याचा निचरा न होणारी जमीन, पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणे यामुळे झाडांच्या मुळा पाण्यात राहिल्यामुळे सुरवातीला झाडे पिवळे पडतात व नंतर ४ ते ५ दिवसांनी झाड वरून पूर्ण वाळत जाते व पिवळे पडून मरतात. याला आपण मररोग किंवा मुळकुज म्हणतो. उताराची व उत्तम निचरा होणाऱ्या जमिनात मररोग होत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖
उपाययोजना : आळवणी (ड्रेंचिंग) प्रति लिटर पाणी
कार्बेन्डाझीम किंवा कॉपर ऑंक्सिक्लोराईड १ ते १.५ ग्रॅम.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*काढणी व उत्पादन*

शेवग्याच्या शेंगा जातीनुसार लागवडीनंतर ५ ते ६ महिन्यांत तोडायला येतात व पुढे ३ ते ४ महिने तोडणी चालते. शेंगा मांसल व मध्यम अवस्थेत तोडाव्यात. एक वर्षांनंतर चांगल्या झाडापास
➖➖➖➖➖➖➖➖➖
*धन्यवाद*  🙏

Comments

Popular Posts