अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकावर होणारे परिणाम आणि त्याचे निवारण
*अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय:*
*नत्र:*
झाडाची खालची पाने पिवळी होतात मुळाची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.
*उपाय:*
१% युरियाची फवारणी करावी. (१०० ग्रॅम + १० लिटर पाणी)
*स्फुरद:*
पाने हिरवट लाबट होऊन वाढ खुंटते, पानाचीं मागील बाजू जांभळट होते.
*उपाय:*
१-२% (१०० ते २०० ग्रॅम प्रति १०लिटर पाण्यातून) डायअमोनियम फॉस्फेट फवारणी करावी.
*पालाश:*
पानांच्या कडा ताबटसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखुड होवून शेंडे गळून पडतात.
*उपाय*
१% सल्फेट ऑफ पोटॅशची फवारणी करावी.(१०० ग्रॅम + १० लिटर पाणी)
*लोह:*
शेड्याकडील पानाच्या शिरामधील भाग पिवळा होतो. झाडांची वाढ खुंटते.
*उपाय*
२५ किलो फेरस सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत देणे किंवा ०.२% चिलेटेड लोहाची फवारणी करणे.
*बोरॉन:*
झाडाचा शेंडा व कोवळी पाने पांढरट होऊन मरतात.
सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात.फळांवर तांबडे ठिपके पडून भेगा पडतात.
*उपाय:*
५० ग्रॅम बोरीक असिड
पावडर १० लिटर पाण्यातून पानांवर फवारणी करावी.
*जस्त:*
पाने लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो व पाने ठिकाणी वाळलेले दिसतात.
*उपाय:*
हेक्टरी १० ते २० किलो झिंक सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत द्यावे किंवा ०.२% चिलेटेड झिंक पिकांवर फवारावे.
*मंगल:*
पानांच्या शिरा हिरव्या व शिरांमधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो व नंतर पांढरट व करडा होतो, संपूर्ण पान फिक्कट होऊन नंतर पान गळते.
*उपाय:*
हेक्टरी १० ते २५ किलो मॅंगेनीज सल्फेट जमिनीतून खतासोबत द्यावे किंवा ०.२% चिलेटेड मंगल ची फवारणी करावी.(२० ग्रॅम +१० लिटर पाणी).
*मॉलिब्डेनम:*
पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात. पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्त्रवतो.
*उपाय:*
हेक्टरी पाव ते अर्धा किलो सोडियम मॉलिबडेट जमिनीतून द्यावे.
*तांबे:*
झाडांच्या शेंड्याची वाढ खुंटते. झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो. खोडाची वाढ कमी होते, पाने लगेच गळतात.
*उपाय:*
मोरचूद ४० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
*गंधक:*
झाडांच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो व नंतर पाणी पूर्ण पिवळी पांढरी पडतात.
*उपाय:* हेक्टरी २० ते ४० किलो गंधक जमीनींतून शेण खतासोबत द्यावे. माहिती सर्व शेतकरी मित्रांना शेर करा धन्यवाद 🙏🌾
Comments
Post a Comment