शेवगा शेती खत नियोजन

🌿खत व्यवस्थापन:-
       शेवगा पिक खतास  उत्तम प्रतिसाद देते. पूर्ण वाढलेल्या झाडास दरवर्षी दहा किलो चांगले कुजलेले शेणखत, 100 ग्रॅम युरिया, 470 ग्रॅम सुपर फॉस्फेट व 125 ग्रॅम म्युरेट ऑफ  पोटॅश ही खते द्यावीत. 
साधारणपणे चांगले उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने खताचे नियोजन पुढील प्रमाणे करावे.
 🌿लागवड करताना सुरुवातीला चांगले कुजलेले शेणखत एकरी 5-6 ट्रली जमिनीत मिसळून घ्यावे. व बेसल डोस देताना एकरी 6 बॅग सुपर फॉस्फेटव 1.5 बॅग mop द्यावे. खत दिल्यानंतर बॅड करून घ्यावेत नंतर प्रत्येक महिन्याला प्रति झाड 100 ग्रॅम, 150 ग्रॅम 15:15:15:, 12:32:16, 10:26:26 अशी खते द्यावीत फुले लागल्यानंतर नत्राचे प्रमाण कमी करून स्फुरद व पालाशचे प्रमाण वाढवले. दाणेदार रासायनिक खते देताना झाडापासून थोड्या अंतरावर रिंग करून द्यावीत. झाडाच्या बुडावर कधी का टाकू नये अन्यथा तेथील साल सडून झाडे मरतात.

🌿 फर्टिगेशन पद्धतीने खते देताना :-
         या पद्धतीमध्ये विद्राव्य खते पाण्याद्वारे थेट झाडाच्या मुळाच्या कक्षेमध्ये दिले जातात.
 🌿फुले लागेपर्यंत
 19:19: 19 हे खत दर आठवड्याला एकरी पाच किलो
🌿 फुले लागल्यानंतर  12:61:00, 13:40:13 आलटून-पालटून दर आठवड्याला एकरी 5 किलो
🌿 शेंगा फुगवण्यासाठी        
00:52:34, 13:00:45
 आलटून-पालटून दर आठवड्याला एकरी 5 किलो 
 विद्राव्य खते झाडाच्या गरजेप्रमाणे देता येतात. तसेच खते मुळाद्वारे लगेच शोषली गेल्यामुळे पिकांना त्वरित उपलब्ध होतात. तरी ही विद्रव्या खताचा वापर मर्यादित करावा प्रमाणापेक्षा जास्त करू नये.
 खतासोबत शेवगा पिकास महिन्यातून एका  हुमिक ऍसिड व सूक्ष्म  अन्नद्रव्ये द्यावेत. यामुळे पांढऱ्या मुळांची संख्या वाढवून सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. ह्युमिक ऍसिड व सूक्ष्म अन्नद्रव्य देताना ड्रीप द्वारे किंवा आळवणी ड्रेचिंग करून घ्यावी. फवारणी करू देऊ नये असमतोल किंवा प्रमाणापेक्षा जास्त खते दिल्यास बागायतीमध्ये अनावश्यक झाडांची वाढ होते परिणामी शेंगांचे उत्पन्न घटते. त्यामुळे जमिनीच्या अवस्थेनुसार खताचे नियोजन करावे.          
सर्व शेतकरी मित्रांना शेर करा धन्यवाद 🌾🙏

Comments