कापूस उत्पादक शेतकरी

शेतकऱ्यांनी एकी करून कापसाला 7000 चा भाव असल्याशिवाय गावात व्यापाऱ्यांना प्रवेश नाही असे ठरवले तर ??!! हा प्रयोग एकट्या दुकट्या गावाने करून उपयोग नाही तर संपूर्ण जिल्हों जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग झाला पाहीजे...  व्यापाऱ्यांना झक मारून कापूस खरेदी करावाच लागेल कारण की त्यांना देखील त्यांचे कारखाने चालवायचे आहेत.

ज्या प्रकारे बि-बियाणे, खते यांचे दर ठरलेले असतात आणी त्यानुसार शेतकऱ्यांना ते घेणे बंधनकारक असते, तसेच मजुर देखील पाहीजे ती रोजंदारी घेतल्याशिवाय शेतकऱ्याच्या शेतात पाय ठेवत नाही, त्याप्रमाणेच शेतकऱ्यांनी आपल्याला कोणी न्याय मिळवून देईल या अपेक्षेत न राहता आहोत त्याच ठिकाणी गावात असे जन आंदोलन करणे महत्वाचे ठरेल... जास्त नाही फक्त पहिल्या 15 दिवसात आंदोलन यशस्वी होईल, पण संपूर्ण जिल्हों जिल्ह्यां मध्ये असे आंदोलन करायला पाहीजे, जेव्हा कुठूनही कच्चा माल मिळणार नाही तेव्हा कारखानदार लोकांना देखील कारखाने बंद ठेवणे परवडणार नाही, ते जेवढ्यात आपल्या कडून घेतील त्याच दरानुसार पुढे त्यांचा माल विकतील अशा प्रकारे पुढे आपोआप ही चैन तयार होईल... न्याय कुणीही दारात येवून देत नसतो तो मिळवावा लागतो सर्वांना शेअर करा धन्यवाद 🤕 🙏

Comments