द्रानक्ष उत्पादन शेतकरी

🌧️⛈️पडत्या पावसात सांगून आलोय झाडांना... दोन दिवस झुंज द्या.. उघडीप मिळताच मी असेन लढाईत सोबतीला...!! आजवर अनेक संकटं आपण मिळूनच पार केली...!! तेव्हा माझ्या पाठीवर थाप टाकून माझ्या कष्टाचं सोनं केलंस तू...!! मीच काय माझ्या संपूर्ण कुटुंबांनं कायमच तुला जपलंय...!! जेमतेम साडेचार पाच महिन्यांचा आपला ऋणानुबंध...पण तोच मला  आणि माझ्या कुटुंबाला समृद्ध करून गेलाय...!! नातंच जोडलं गेलंय रे तुझ्याशी....!! जेव्हा सर्वांनी पाठ फिरवली तेव्हा तूच तर आलास धावून...!! अजून बराच प्रवास करायचं ठरलंय आपलं.! मला माहीत आहे संकट गंभीर आहे..!! तू सुकतोय. आधिचा बहार संपवून ताकद कमी झाली आहे तुझी...!! पण आपली जिद्द म्हणून परत खूप छान बहरलायस तू.. मी सुद्धा तुला पाहूनच लढायला शिकलोय.! फक्त दोन दिवस... हो दोनच दिवस लढायचंय आपल्याला...!! ऐतिहासिक, रेकॉर्ड ब्रेक वाटचाल करायची ठरलंय आपलं...!! झालेली झीज कशी भरून काढायची त्याचे नियोजन मी करून ठेवलंय.गरज आहे तुझ्या साथीची.!! माणसं साथ देत नाहीत म्हणून आधिच हरलोय रे मी..ल.! तू साथ नाही दिलीस तर मोडून पडेन मी ही आणि माझा आत्मविश्वासही....!!!                         🍇 द्राक्षबागायतदार🍇

Comments