गोकृपामृत

गोकृपामृत:

कृती:
२००लि पाणी
+१लि विरजण 
+१लि ताक (ताजे) फक्त देशी गाईचेच
+१किलो गुळ
+ घड्याळ्याच्या दिशेने रोज सकाळी १मि. ढवळणे
+ कापडाने झाकुन ठेवणे
+ ५/७ दिवस किण्वन क्रिया

१)जमिनीद्वारे: दर १५ते३० दिवसांनी
आच्छादन (संजीव/निर्जीव+सहजीवन)कार्बन निर्मिती
+ गायीचे शेण/खनिज खत- ४टन/एकर (जिवाणूंचे मुळ खाद्य संतृप्त कार्बन पुरवठा) - वर्षातुन एकदाच
+ २००ते१०००लि गोकृपामृत प्रति एकर

२)पिक संप्रेरक/संजीवक फवारणी: प्रति १५लि पंप प्रमाण
भाजिपाला/हंगामी पिक - १.५ ते २लि दर ५/७ दिवसांनी
कडधान्ये/ऊस/फळबागा - २ ते ३लि दर ७/१५ दिवसांनी

३)किट नियंत्रण फवारणी:
   (प्रति १५लि पंप प्रमाण)

सामान्य प्रादुर्भाव:
२लि गौकृपामृत+ १लि गोमूत्र(फुलधारणेत कमी वापरावे) दर ७दिवसांनी

उग्र(आणीबाणी) प्रादुर्भाव:
२लि गौकृपामृत
+ १लि गोमूत्र (ताजे)
+ १लि ताम्रताक (ताक+तांबे तुकडे+४५दिवस)

४) खनिज खतनिर्मिती: (२०लि/टन)
१ टन शेण (२'उंच २'रंद व लांब रांगा)
+ सावली
+ ओलावा
+ २०लि गोकृपामृत फवारणी
+ ४०-६० दिवस अपघटन
प्रमाण: जमिन मशागतीपूर्वी ४टन/एकर/वर्ष (जिवाणूंना कार्बन पूर्तीसाठी)

टीप:
१)* यातील जिवाणूंसाठी सर्वोत्तम कार्बन संतृप्त खुराक गायीचे शेण-गोमूत्र असल्याने, दुरगामी सर्वोत्तम परीणामांसाठी वार्षिक एकरी ४टन/एकर खनिज शेणखत सुरवातीचे काही वर्षे बंधनकारक आहे
२)जिवाणू चक्र दर १० दिवसांचे सर्वोत्तम क्रियाशील परीणाम दर्शवते
३)जिवाणू वंश जिवनचक्रासाठी दर १ते१.५ महीन्यात गुळ पडेल अशी व्यवस्था(व्यापारी तत्वावर) सोयीस्कर
सतत वापरण्यासाठी आधीचे गोकृपामृत ५ते१०% किंवा १लि शिल्लक ठेऊन वरील पध्दतिने पुन्हा बनवणे
४)वापरात नसल्यास जिवाणु सुप्तावस्थेत १वर्ष राहतात
५)मातृ जिवाणु संस्कृति ३वर्षां नंतर जवळील शेतकरी/बंसी गीर गोशाळा द्वारा वर्ण संकर(Cross) करून पुन्ह ३वर्ष वापरा
६)फवारणी आवर्तने संप्रेरक व किडरोधक आलटून पालटून घ्यावे

जिवाणू विविधता:
१)६० पेक्षा जास्त प्रकारचे पंचगव्य जिवाणू वंश 
२)४ प्रकारचे हवेतील नत्र स्थिरीकरण जिवाणू
३)फॉस्फरस सुपाच्य अवस्थेत रूपांतरण जिवाणू
४)४-६ प्रकारचे किट/बुरशी नियंत्रक जिवाणू
५)०६ प्रकारचे अपघटन जिवाणू
६)Lactobacillusis जिवाणू शर्करेचे Lactic Acid रुपांतरण, रोगप्रतिकारशक्ती वाढवते, विघटनशील
७)Jiobacter जिवाणू धातू-खनिज सुपाच्य अवस्थेत रूपांतरण
८)या व्यतीरीक्त काही सुक्ष्मान्नद्रव्य पुरवणारे जिवाणूंची निर्मिती सहजीवन पध्दतीने ह्या जिवाणूंद्वारे होते
९)या जिवाणूंचा मुख्य खुराक गायीचे शेण व गोमूत्रच आहे, त्यासाठी ४टन/एकर खनिज खत आवश्यक आहे.

उपयोग:
वाढ संजिवक, वातावरण वेगाने अनुकूलन, सुक्ष्म अन्नद्रव्य अन्नद्रव्य पुरवठा
जमिन मऊ, सच्छिद्र,आद्रता स्थिर, गांडुळे वाढ, ह्युमस निर्मिती पोषक स्थिती, ७५ते८०% पाणी बचत

Comments