शेवगा लागवड आणि बाजार पेठ

 🍀*शेवगा लागवड🍀 🍀बाजारपेठ, 🍀

🍀छाटणी व 🍀

🍀फवारणी.*🍀🇮🇳🇮🇳


         2018 वर्षी ज्यांनी शेवगा लागवड केली त्यांना चांगल्याप्रकारे भाव व पैसे मिळाले पण २०१९ हे वर्ष शेवगा बागायतदारांसाठी अति पावसामुळे तसेच वातावरणातील लहरीपणामुळे,चढ उतारामुळे अपेक्षित असे उत्पन्न खर्च करुनही मिळाले नाही

सुरुवातीपासून म्हणजे 14 डिसेंबर पासून 25 एप्रिलपर्यंत  ४५ रू ते १० रूपयेपर्यंत सरासरी भाव मिळाला. फेब्रु,मार्च तसेच एप्रिल महिन्यापर्यंत माल भरपूर लागला परंतू अपेक्षित असा भाव मिळाला नाही तरी शेतकरी बंधूंनी हिंमत हरली नाही नवीन जोमाने परत मे महिन्यात खरड छाटणी काही शेतकरी बंधूनी केली किंवा या महिन्यात किंवा १५ जूनपर्यंत करणार आहेत 

यावर्षी बरेच शेतकरी बंधूं नवीन शेवगा लागवड करणार आहेत किंवा काहिंची लागवड झालीही असेल तरी सर्व शेवगा शेतकरी बंधुंना चाटे बंधू  कडून विनंती असे की अजूनही शेवगा पिकाच्या बाबतीत हिंमत हारु नये,मागील वर्षी (२०१९ - २०२०) कमी उत्पन्न मिळाले तरी यावर्षी जोमाने तयारीला लागणे कारण प्रत्येक वर्ष मागील वर्षासारखे राहत नाही. 


                  माझ्या स्वतःच्या अनुभवावरून भारी जमीन असेल तर 12*6अंतर ठेवा.हलकी जमीन असेल तर 12*5,10*5,12*4, 10*4अंतर ठेवा.यांच्याखाली अजिबात तडजोड करू नका कारण शेवगावर बुरशीचा प्रादुर्भाव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात होतो.हवा खेळती राहण्यासाठी एवढे अंतर आवश्यक आहे.

शक्यतो ठिबकवर लागवड करा, ठिबक नसेल तर सरीवर लागवड केली तरी चालेल. 

शेवग्याला सर्व प्रकारची जमीन चालते.

शेवग्याला आॅक्टोबर ते 15 फेब्रुवारीपर्यंत चांगला भाव मिळतो म्हणून लवकरात लवकर लागवड करावी

फेब्रु ते जून अतिशय कमी भाव मिळतो.

लागवड करतांना एका ठिकाणी 2 ते 3 बिया अर्धा फूट अंतर ठेवून लावाव्या. 

रात्रभर शेवग्याच्या बिया पाण्यात  भिजवून दुसऱ्या दिवशी कोरड्या फडक्यावर वाळवून बुरशीनाशका ची बीज प्रक्रिया करून अर्धा  इंच खोलीवर टोकण करावे.बी उगवून आल्यावर मोजके पाणी द्या. जास्त पाणी दिल्यास रोप मरण्याची शक्यता आहे.शेवगा उगवून आल्यानंतर  2 रोपे मधील  महिन्यानंतर काही रोपे लाल दांडीचे असतील तर ते रोप अवश्य काढावे.लाल दांडीचे रोप असेल तर त्या शेंगा लाल येतात त्यांना बाजारात किंमत नाही त्या फेकून द्याव्या लागतात. 

शेवगा हे कमी पाण्यावर येणारे पिक आहे. 

दर पंधरा ते वीस दिवसांनी बुरशीनाशकाची व किटकनाशकाची योग्य ती फवारणी अवश्य घ्यावी.पाने खाणाऱ्या अळीचा व मकडी ( लाल कोळी) जास्त प्रादुर्भाव शेवगावर दिसतो यासाठी जास्त महागडी औषधे फवारणीची काही गरज नाही. साधी साधी औषधे उदा. नुवान,बाविस्टीन,रोगोर,एम 45 फवारावे.

झाडे ३ ते ४ फुट होईपर्यंत छाटणी करू नका. मागील लेखात मी छाटणी विषयी मार्गदर्शन केले आहेच.

बरेच शेतकरी विचारतात की शेवगा लागवड मोठ्या प्रमाणात मागील वर्षी तसेच यावर्षी सुध्दा होणार आहे कारण शेवगा हे असे पिक आहे की निसर्गाने साथ दिली की भरपूर उत्पन्न व पैसा देऊन जाते कारण शेवगा हे पिक ९०%निसर्गावर व १० % आपल्या नियोजनावर अवलंबून आहे त्यासाठी योग्य नियोजन व चर्चा करणे आवश्यक आहे.

शेवग्याला भाव मिळेलच फक्त ते निर्यातीच्या कालावधीमध्ये जसे की आॅक्टोबर ते जानेवारी या कालावधीमध्ये माल यायला पाहिजे कारण शेवग्याच्या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन,कॅल्शियम,जीवनसत्त्वे असतात हे लोकांना आता समजू लागले आहे.दक्षिण भारतात - तामिळनाडू,आंध्रप्रदेश,तेलंगणा या राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते.पश्चिम बंगाल, बांगलादेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते, आखाती देशात मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. मुंबईलाच वाशी मार्केटमध्ये २०० ते ३०० व्यापारी शेवगा खरेदी करतात व निर्यात करतात म्हणून शेवग्याला चांगले भवितव्य आहे.🙏🙏🙏🙏🌱🌱🌱 

सर्व शेतकरी मित्रांना ही माहिती शेर करा धन्यवाद 

Comments