हरबरा लागवड तंत्रज्ञान
हरभरा लागवड तंत्र
🌿🌿🌿🌿🌿
हरभरा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे एक प्रमुख कडधान्य पीक आहे. शेती आणि मानवी आहारातही या पिकास अनन्यसाधारण असे महत्व आहे. सुधारित वाणांचा वापर करत पारंपारिक लागवड पद्धतीमध्ये योग्य बदल करून सुधारित लागवड व प्रगत तंत्रज्ञानाची जोड दिल्यास कोरडवाहू क्षेत्रातदेखील हरभरा पिकापासून चांगले उत्पादन मिळवणे शक्य होते.
जमिनीची निवड व हवामान
हरभऱ्यास ओलावा टिकवून ठेवणारी, मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी काळी कसदार, भुसभुशीत जमीन सर्वोत्तम ठरते.
ओलिताची उपलब्धता असल्यास उथळ ते मध्यम जमिनीत देखील हरभरा पिक घेता येते. हलकी, चोपण, पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत, तसेच आम्ल जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
हरभरा पिकाला हिवाळ्यातील थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सुर्यप्रकाश असे वातावरण मानवते. विशेषतः पिक २० दिवसांचे झाल्यानंतर किमान तापमान सर्वसाधारणतः १० ते १५ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस असेल, तर पिकाची वाढ चांगली होऊन भरपूर फांद्या, फुले आणि घाटे लागतात. उष्ण हवामानात या पिकाची वाढ चांगली होत नाही. हरभऱ्याचा फुलोऱ्याचा काळ थंडीत येईल आणि जितका काळ थंडीचा राहील त्याप्रमाणे उत्पादनात वाढ संभवते. ढगाळ वातावरण, अतिरिक्त आर्द्रता, अवेळी पाऊस यांचा पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.
पूर्वमशागत
खरिपातील पीक निघाल्याबरोबर जमिनीची मध्यम नांगरट 🌿करून त्यानंतर ओखराच्या दोन पाळ्या द्याव्यात. पाळ्यां घेऊन जमीन भुसभुशीत झाल्यावर जमिनीतील काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी.
आणि ही माहिती सर्व शेतकरी मित्रांना शेर करावी धन्यवाद 🌾🙏
Comments
Post a Comment