शेवगा लागवड सर्वांचे उत्तर

सर्व शेवगा लागवड मित्रांनी वाचा सगळ्याची उत्तर या मध्ये आहेतनमस्कार मित्रांनो एक महिन्यानंतर झाडाची सारखे वाढ होण्यासाठी झाडाला ड्रीप मधून एकरी अडीच किलो 19 .19.19. या खताचा डोस द्या व त्यानंतर आळी असेल तर नुवान एका लिटरला दीड मिली याप्रमाणे फवारणी करा त्यामध्ये बुरशीनाशक साफ पावडर पण आपण वापरू शकता जेणेकरून झाडाचा पिवळे पणा दूर होईल व त्याच्यानंतर ड्रिप मधून आठ दिवसांच्या अंतराने साप पावडर एकरी 500 ग्रॅम व ह्युमिक ऍसिड 500 ग्रॅम पावडर दोनशे लिटर पाणी करून ड्रीप द्वारे द्या म्हणजे झाडाची जेणेकरून मुळाची संख्या वाढेल व 19 .19.19. आठ ते दर पंधरा दिवसांनी अडीच किलो देत रहाजेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल व आपले झाडे चांगल्या प्रकारे तयार होते मित्रांनो सर्वांची झाडे एक ते दीड महिन्याचे आहे याच्या करता फवारणी करताना आळी साठी नुवान किंवा मोनोक्रोटोफास या औषधांची फवारणी करताना एका लिटर ला दीड मिली या प्रमाणात वापरावे व बुरशीनाशक म्हणून साफ पावडर किंवा रोको किंवा झेड 78 किंवा इंट्रा कॉल किंवा बाविस्तीन किंवा m45 यापैकी कोणते एक बुरशीनाशक प्रतिलिटर दोन ग्रॅम घ्यावी व फवारणी करावी ज्यांचे झाडे मर होत असतील त्यांनी ड्रिप मधून ड्रिंचिग करावी ज्यांच्याकडे डीप नाही त्यांनी आळवणी करावी एका लिटर ला वरीलपैकी कोणते बुरशीनाशक दोन ग्रॅम घ्यावे व त्यामध्ये अडीचशे ग्रॅम ह्युमिक ऍसिड पावडर वापरावे जेणेकरून आपले झाडे सक्षम होतील धन्यवाद

Comments