रेशीम उद्योग
*नमस्कार रेशीम शेतकरी बांधवांनो* ,🙏🙏🙏🙏
बरेच दिवस रेशीम शेती विषयी काहीतरी गोष्टी आवश्यक आहेत असे वाटत होत्या. परंतु त्या मूर्त स्वरूपात लिखाणात मांडता येत नव्हत्या. परंतु आज जेव्हा श्री महादेव शिंदे यांनी जी व्हिडीओ क्लिप पाठवली तेव्हा मला जे रेशीम शेतीसाठी आवश्यक विचार व्यक्त करता येत आहेत ते मी माझ्या परीने मांडण्याचा प्रयत्न करत आहे, काही गोष्टी चुकले असतील किंवा काही ज्ञात अज्ञात रेशीम शेतकरी बांधव किंवा अधिकारी यांच्याबद्दल काही चुकीचे लिहिले गेले असेल तर आपला लहान शेतकरी बांधव म्हणून मला क्षमा करावी ही अपेक्षा ?
रेशीम शेती करत असताना मजूर हा घटक खूप महत्वाचा आहे . माझ्यामते रेशीम शेतीत किमान 325 दराने कोष विक्री झाली तर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसे शिल्लक राहतात, पण याचवेळी जे शेतकरी तुतीच्या अर्थाने म्हणजे तू आणि ती मिळून हा व्यवसाय करतात त्यांना चांगले उत्पन्न मिळते, तरीही यासाठी शारीरिक कष्ट जास्त प्रमाणात करावे लागते, एकदा का ब्याच चालू झाली की कामात चालढकल करून चालत नाही, अश्यावेळी शेडमध्ये काम करत असताना काहीतरी नवीन जुगाड करणे आवश्यक असते तशी जुगाड काही शेतकरी करत आहेत. पण ते इतर रेशीम शेतकरी बांधवापर्यंत पोहचत नाहीत तर अश्या काही नवीन कल्पना रेशीम शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. तसेच शेडमधील प्राथमिक गरजा जश्या की शेडनेट, बारदान वीट बांधकाम, 4 थ्या व 5व्या कप्यात कीटकांना पाला देण्यासाठी आवश्यक असणारा लोखंडी गाडा , शिडी, स्टूल, तसेच रेल्वे लाईन सारखे पाळणा, शेतातील पाला कमी वेळेत कट करण्यासाठी आवश्यक अवजारे, पाला शेड पर्यंत पोहचवण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री इत्यादी अनेक गोष्टी विचारात घेऊन या क्षेत्रातील अनुभवी व प्रयोगशील शेतकऱ्यांनीं प्रयत्न करने आवश्यक आहे.
माझ्या मते श्री महादेव शिंदे, श्री यशकुमार पेंन्टे श्री बालाजी पवार श्री बालाजी हाके पाटील 🐛🌿👉🏻श्री सोपान शिंदे श्री बाजीराव जाधव श्री महादेव बिराजदार श्री सुनील गावडे श्री दीपक बुणगे श्री श्रीधर श्रींगारे श्री शिवप्रसाद लगारखा श्री माऊली समुद्रे श्री सुनील खाडे श्री गजानन बुर्ले श्री सावंता व वैभव माळी बंधू असे ज्ञात अज्ञात अनेक अनेक शेतकरी आपापल्या परीने रेशीम शेतीतील कष्ट कमी करण्यासाठी आवश्यक असणारे जुगाड करत आहेत या सर्वांना आपल्या परीने यश प्राप्त होणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यातील रेशीम शेती ही मजूरा वाचून कमी होण्याचा धोका राहणार नाही तसेच जरी या शेतीमध्ये घरातील सर्व मंडळींनी जरी काम केले तरी शारीरिक कष्ट कमी होतील.
व रेशीम शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील त्यांच्या जीवनात एक चांगल्या प्रकारचे आर्थिक स्थैर्य निर्माण होऊ शकेल.
यासाठी नक्कीच आपण नवनवीन प्रयोग करून रेशीम शेती मधील कष्ट कसे कमी करता येईल त्या साठी कोणकोणत्या गोष्टी मध्ये बदल करता येईल व आपले कष्ट कसे कमी होईल या वरती आपण सर्वांनी आपल्या आयडिया सर्वांना दिली पाहिजे कष्ट कमी झाले तरच रेशीम शेती टिकेल.
Comments
Post a Comment