आले उत्पादक शेतकरी

*आले* 
                            

पानावरील ठिपके (रोगकारक बुरशी : फायलोस्टीका झिन्जीबेरी)
ढगाळ वातावरण सतत राहिल्यास आणि आर्द्रता ९० टक्क्यांच्या वरती राहिल्यास रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. रोगाची सुरवात कोवळ्या पानावर होऊन नंतर तो सर्व पानांवर पसरतो. पानावर असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात.
👉 नियंत्रण - मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा एक टक्का बोर्डो मिश्रण तयार करून फवारणी करावी. हवामान परिस्थितीनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात १५ ते २० दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.

Comments