रेशीम कीटक उद्योग

उजी आपल्याकडे आलिका  आली असेल नसेल आपल्या जवळ सभोतालच्या भागात अली असेल येणार  तर नाही तरी पण काळजी घेतलेली बरी जस सीमेवर सैनिक आहे म्हणजे घुसखोरी होणार नाही तिथं जर कोण्हीच नसेल तर मग   ,  त्या प्रमाणे आपल्याला सतर्क रहावं लागेल म्हणून  आपण तिला आपल्या गावच्या सीमेवर रोखू शकता किंवा आपल्या शेडच्या बाहेर रोखू शकता .🏹🐝🐝🐝🐝 त्याला सोपा उपाय आहे .  उपाय आहे  * उजी ट्रॅप *  हे औषध केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था मैसूर येथे विकसित करण्यात आले आहे . उजी माशांना आकर्षित करून मारण्यासाठी वापरण्याची पद्धत  1. या उजी ट्रॅप  गोळ्याचे द्रावण  पांढऱ्या पात्रात मग पल्यास्टिकच्या टोपल्यात किंवा पांढरा कलर दिलेलं टोपले कोणतही 5 लिटर पर्येंत  पाणी बसेल अस घ्या पण पांढऱ च कलरच घ्या  . 2 .  एक उजी ट्रॅप गोळी 1 लीटर पाण्यात टाकून अश्या प्रकारे द्रावण तयार करावे पिवळे द्रावण तयार होते हे द्रावण शेड बाहेर शेड पासून साधारण 50 फूट अनंतराव एक लाईट लावून शेड कडे पूर्ण अंधार करून  ठेवावा किंवा आपल्याला योग्य जागा वाटते अश्या ठिकाणी  वर लाईट च्या खाली जमिनी पासून 4 ते 5 फूट वर स्त्यांड करून त्यावर द्रावनयुक्त पांढर कलरच  टोपले ठेवावे  उजी माशी अंधाराकडून प्रकाशाकडे आकर्षित होतात व त्याच ठिकाणी ऊजीट्रॅप चे द्रावण असल्यास अधिक आकर्षित होऊन द्रावणात पडतात .  एकदा द्रावण केलेले तीन ते चार दिवस चालते नंतर बदलून दुसरे करावे  उजी ट्रॅप चा उपयोग , तिसऱ्या अवस्थेपासून ते कोष गुंडाळून होई पर्यंत करावा . हा ट्रॅप सगळ्याच साठी उपयुक्त आहे बहुगुणी रेशीम कीटका साठी अत्यन्त उपयुक्त आहे कमी खर्चिक  मोठ्या प्रमाणावर उजी चा बंदोबस्त होऊ शकतो . अधिक माहिती तज्ञाकडून घ्यावी एक उजी 100 ते 110 अंडे घालते  आणि हो एक विशेष कोष बांधणीच्या वेळेस चन्द्रिकेतिल अळ्यावर दळून बारीक केलेली गुळगुळीत मऊ अशी चिनी मातीची भुकटी कपड्यातून धुरळावी आशा मुले ऊजीचा  हल्ला टळतो एखादी चुकून आपल्या सीमेवरल्या सारख आपल्या सैनिकासारखं त्यांना जर बुलेटप्रूफ असेलतर अचानक केलेला हल्ला टळतो तसच ही  चिनी मातीच करते मित्रहो   ही चिनी माती  100 अंडीपुंजासाठी  3 किलो भुकटी लागते  ही स्टेप पूर्व सूचना म्हणून आहे  . तस तर उजी  येणारच नाही नाही याची मला खात्री आहे तरी पण एखाद्याने जर मार्केट मधून पोते आणले तर च त्याची काळजी नाही घेतली तर🤔 धन्यवाद मित्रांनो काही चूक झाली तर माफी असावी धन्यवाद माहिती संकलन :-  एक छोटासा रेशीम शेतकरी सोपानराव शिंदे 🐛 एकच ध्यास रेशीम विकास  फोन न सतत रेशीम शेतकऱ्यासाठी निस्वार्थ योगदान केव्हाही कधीही कोण्ही नाही कोणाचं शेतकरयासाठी शेतकरीच कामी पडत आहेत  आणि हेच महत्वाचं आहे कारण शेतकऱ्यांनाच अनुभव आहे अनुभवाचे बोल असतात  चला एकमेका सहाय्य करू .........जय हो रेशीम 🐛🌿

Comments