ढगाळ वातावरणामुळे होणारे रोग

*ढगाळ वातावरणामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याआधीच हे करा उपाय...*

_हवामान विभागाने ४ ते ५ दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. अशा वातावरणाचा शेतातील पिकांवर परिणाम होतो आणि कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो._

_शेतकऱ्यांचे अश्या वातावरणामुळे अतोनात नुकसान होते शेतातील पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असतानाच ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊन पिकांचे नुकसान होते._

_अश्या ढगाळ वातावरणात शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून काय उपाय योजना करावेत आणि काय काळजी घ्यावी याची माहिती असणे महत्वाचे आहे._

_बदलत्या वातावरणाचा परिणाम पिकांवर कसा होतो आणि उपाय योजना_

*हरभरा*

_हरभरा पीक हे सध्या वाढीच्या अवस्थेत असल्याने त्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.त्याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% एस.जी. ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून स्वछ वातावरणामध्ये फवारणी करावी. तसेच "T" आकाराचे २ ते ३ फूट उंचीचे हेक्टरी किमान ५० पक्षी थांबे लावावेत, शेतात पाणी थांबू नये याची काळजी घ्यायला हवी._

*गहू*

_गव्हावर मावा कीड आणि तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, तसेच शेंडे माशीचा ही प्रादुर्भाव होऊ शकतो. थंडी कमी झाल्याने पिकांची वाढ मंद होते._

*ज्वारी*

_यावर मावा किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. रब्बी ज्वारी पीकामध्ये लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५%_

_एस.जी. ४ ग्रॅम किंवा थाएमेथॉक्सम १२.६% + लॅम्बडा- सिहालोथ्रीन ९.५% झेड.सी. ५ मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून स्वछ वातावरणामध्ये फवारणी करावी._

*भाजीपाला*

_बटाटा , टोमॅटो पिकांमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. वेलवर्गीय भाज्यांमध्ये डाऊनीचा प्रादुभाव होऊ शकतो_

_भाजीपाला पिकामध्ये कीड व रोग व्यवथथापन करावे._

 _वांगी पिकात शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीच्या_ _व्यवथथापनासाठी सायपरमेथ्रीन १० टक्के ईसी ५५० ते ७६० मिली प्रति हेक्टरी १५० ते ४०० प्रति लिटर_

_पाण्यात मिसळून स्वछ वातावरणामध्ये फवारणी करावी_

*आंबा*

_आंब्याला मोहोर लागलेला आहे. त्यावर भुरी आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.आंब्यावरील मोहराचे भुरी व तुडतुड्यापासून संरक्षण करण्यासाठी लॅम्बडा- सिहालोथ्रीन ५% ई.सी. ६ मिली + हेक्साकोनाझोल ५ मिली किंवा गंधक ८०% डब्ल्यू.पी. २० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वछ वातावरणामध्ये फवारणी करावी._

*रब्बी भुईमूग*

_टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. टेबुकोनाझोल २५% डब्ल्यू.जी. १० ते१५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वछ वातावरणामध्ये फवारणी करावी._

_उपट्या जातीच्या भुईमूग पीकामध्ये पेरणीनंतर ४५ ते५० दिवसानंतर पिकांवर रिकामा ड्रम फिरवावा जेणेकरून आऱ्या जमिनीत जाण्यास मदत होईल._

*द्राक्ष*

_द्राक्षांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे._

*केळी*

_केळी वर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते._

Comments