कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना
*कांदा उत्पादकांसाठी महत्त्वाची सुचवा*.
सर्व शेतकरी बंधूना विनम्र आवाहन करण्यात येत आहे की, बरेच ठिकाणी कांदा काढणीचे काम सुरू आहे.जे मजुर स्रि पुरुष तोंडाला मास्क,चारपदरी रूमाल,उपरणे,ओढणी न वापरता कांदा काढणी करत आहे.त्यावेळी ओल्या कांद्याची वाफ, धुळ, तोंडांत गेल्याने त्यांना सर्दी, खोकला यांचा प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या कोरोना व्हायरस कोव्हीड -१९ मुळे संपुर्ण देशात विविध प्रकारच्या सुचना देऊन काळजी घेण्यास सांगितले आहे.तसेच कांदा हा कांदा चाळीत साठवण करतांना त्यावेळी फोरेटचा व इतर रासायनिक पावडरी चा वापर करत असल्याने ते श्वसनाद्वारे नाका तोंडाने गेल्याने कांदा भरणारे शेतकरी व मजुर यांना ARI ची लक्षणे ग्रामीण भागात दिसत आहे.यात डोळ्यांची जळजळ,नाक चोंदणे,घसा खवखवणे,काही दिवसाने ताप येणे असे प्रकार घडत आहेत.तरी शेतकरी बंधूना नम्र विनंती कि आपण व आपले मजुर यांनी कंपलसरी मास्क बांधुन , सोशल डिस्टन्स ठेवून व सॅनिटायझर चा वापर , वेळोवेळी साबणाने हात धुणे पद्धतीचा अवलंब करावा.तसेच कांदा साठवणूक करतांना खुप काळजी घ्यावी.
Comments
Post a Comment