शेवगा लागवड माहिती
*शेवगा लागवड*
*१. जमीन व हवामान*
सम व दमट हवामानात या पिकाची वाढ चांगली होते. वाळूमिश्रित पोयट्याच्या तसेच डोंगर उतारावरील हलक्या माळरानाच्या भरास जमिनीतही या पिकाचे उत्पन्न येते.
*२. लागवड :*
कमी पावसाच्या प्रदेशात जून – जुलै मध्ये तर जास्त पावसाच्या प्रदेशात ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये लागवड करावी. जमीन जर एकदम हलकी असेल तर शेवग्याची लागवड ही ६'x ६' ते ७'x ७' फुटावर करावी. तर मध्यम ते भारी जमिनीत शेवग्याची लागवड ८'x ८' ते १०'x १०' वर करावी. ज्यावेळेस शेवग्याची प्रत्यक्ष लागवड केली जाते. ती कमी -अधिक अंतरावर असते. त्यामुळे त्याचा फळधारणेवर विपरित परिणाम होतो. भारी काळ्या जमिनीत तिची जलधारणक्षमता अधिक असते. अशा जमिनीत लागवडीतील अंतर कमी झाल्यास आणि आवश्यकतेहून अधिक पाणी दिल्यास झाडाचा बुंधा लहान राहून फांद्याही बारीक जाडीच्या उंच अवास्तव वाढून फुलकळी कमी लागते. तर लागवडीतील अंतर जड झाल्यास अमर्याद फुटवयाची अवाजवी वाढ होते. फांद्या छाटणी न केल्याने उचं जातात व वांझा निघतात. तसेच जादा विशेषकरून नत्र व स्फूरद्युक्त अन्नद्रव्ये अनावश्यक फांद्या वाढीकडे खर्च होतात. त्यामुळे फळधरणेमध्ये अडचण निर्माण होते. लागवड १ ते २ फुट लांबीचे खुंट किंवा बियापासून रोपे तयार करून करता येते.
*३. लागवडीनंतर घ्यावयाची काळजी:*
- झाडाची आळी खुरपून स्वच्छ करावी. तसेच दोन झाडांच्या ओळीत वखरणी करावी. म्हणजे तणांचा उपद्रव होणार नाही.
- प्रत्येक झाडास १० किलो शेणखत, ७५ ग्रॅम नत्र (१६५ ग्रॅम युरिया), ५० ग्रॅम स्फुरद ( ३१२ ग्रॅम सुपर फॉस्फेट) व ७५ किलो पालाश (१२० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे.
*३. शेवग्याची छाटणी*
शेवग्याची छाटणी करण्याचे काम अत्यंत जिकीरीचे असते. शेवग्याची झाडे लागवडीनंतर १ || ते २ महिन्याची झाल्यावर २ ते २ || फुट उंचीची असताना शेंड्याची छाटणी करावी. त्यानंतर तो शेंडा पुन्हा जोम धरतोच, त्यामुळे पुन्हा काट करावा. म्हणजे ३ ते ४ फुटी वेगवेळ्या दिशेला निघतील. त्यानंतर मुख्य शेंडा आठवड्यातून २-३ वेळा न चुकता खुडावा आणि बाजूचे चौफेर फुटवे आठवड्यातून १ ते २ वेळा खुडावेत. म्हणजे अनावश्यक वाढ थांबून खोड, फांद्या जाड, झाडे डेरेदार होतील व त्यामध्ये आवश्यक अन्नसाठा तयार होईल. पुढे हा अन्नसाठा फुलकळी लागण्यास तसेच शेंगांचे पोषण करण्यास उपयुक्त ठरेल
*धन्यवाद* 🙏
Comments
Post a Comment