मिरची पपई पिकावरील खोकडा बोकडा रोग नियंत्रण

चुरडा मुरडा / कोकडा / बोकडा / घुबडा यालाच leaf curl व रसशोसक किडी मुख्यत: कारणीभूत असतात.
यासाठी नैसर्गिक शेतीतील उपाय 
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
१) मिरची, पपई व ईतर पीकांची लागवड करीत असताना योग्य सहजीवन निवडणे.
उदा. - चवळी, मका, झेंडू, तसेच द्विदल पिके व एकदल यांचे योग्य नियोजन करणे.
२) कोणतेही फक्त एकच पिक घेतल्यास हा रोग जास्त प्रमाणात येतो. सहजीवन केल्यास हा रोग कमी प्रमाणात येतो.
३) जमिनीत वाफसा ठेवावा.
४) जमिनीवर सतत  सजिव व निर्जीव अच्छादन ठेवावे.

● उपाय ●
१) आंबट ताक ३ लिटर व  १० लिटर जिवामृत १०० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. सतत ८ दिवसाच्या अंतराने ह्या फवारण्या घ्याव्यात.

२) दशपर्णी अर्क ८ लिटर + २ लिटर गोमूत्र एकत्र करुण १०० लिटर पाण्यात फवारणी करावी. 
वरील दोन्ही फवारण्या आलटून पालटुन ४ दिवसाच्या अंतराने घ्याव्यात. 

३) १०० लिटर पाण्यात ३ किलो कांद्याचा लगदा करुन चांगले ढवळून याची गाळून फवारणी करावी.

४) २ किलो तंबाखू ( काड्या किंवा भुकटी ) घ्या. 
८ लिटर पाण्यात १ तास उकळा.
उकळल्यानंतर खाली उतरून त्यामध्ये २ किलो बाजरीचे पीठ टाकून चांगले घोटावे.
थंड झाल्यावर त्यात ५० लिटर पाणी व २ लिटर आंबट ताक  टाकून चांगले एकजीव करून अर्धा तासाने गाळून १५० लिटर पाण्यात टाकुन फवारणी करावी.

५) 200 लिटर पाण्यात +
1 किलो तबांखु +
1/2 किलो लसुण +
1/2 किलो हिरवी तिखट मिरची 
बारीक करून 48 तास भिजवुन नंतर गाळुन फवारणी करणे.
★★★★★★★★★★★★

Comments