कांदा रोपवाटिक

*कांदा-*  🧅🧅
🧅खरीप कांदा रोपवाटिका
साधारणपणे मे-जून महिन्यात बी पेरून जुलै-ऑगस्ट महिन्यात कांदा रोपांची लागवड करावी. हा कांदा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात काढणीस तयार होतो. एक एकर क्षेत्रावर लागवडीकरिता रोपांच्या उपलब्धतेसाठी सुमारे २ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. त्यासाठी २-२.८ किलो बियाणे लागते. रोपवाटिकेसाठी जमीन तयार करताना प्रथम खोल नांगरट करावी. त्यामुळे कीटकांचे कोष व तणांच्या बिया सूर्यप्रकाशात उघड्या पडून नष्ट होतात. वाफे तयार करण्यापूर्वी पूर्वीच्या पिकाची धसकटे, काडीकचरा, तण आणि दगड काढून टाकावे. दोन क्विंटल चांगले कुजलेले शेणखत घालावे. मर रोगाचे नियंत्रण करून निरोगी रोपे मिळवण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ५०० ग्रॅम प्रति २ क्विंटल कुजलेल्या शेणखतात मिसळून वापर करावा. गादीवाफे १० ते १५ सें.मी. उंच, १ मीटर रुंद आणि सोयीनुसार लांब तयार करावेत. तणांच्या बंदोबस्तासाठी पेंडीमिथॅलीन २ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारावे. मातीतून पसरणाऱ्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी नत्र १.६ किलो, स्फुरद ४०० किलो, पालाश ४०० ग्रॅम प्रति २०० वर्ग मीटर क्षेत्र या प्रमाणात खतमात्रा द्यावी. बियाण्याची लागवड ओळींमध्ये ५ ते ७.५ सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे. त्यानंतर थोडे पाणी द्यावे. सिंचनाकरिता ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते

Comments