रासायनिक खते व त्यातून मिळणारी मात्रा

● रासायनिक खते व त्यातून मिळणारे खतांची मात्रा●

1️⃣ जेवढ्या किलोची बॅग आहे त्याला मिक्स प्रोपोर्शनने गुणायचं म्हणजे त्यातील अन्नद्रव्य किती आहे ते कळतं.

2️⃣ उदा: 12:32:16 (50 किलोची बॅग) तर,
50 × 0.12 =6 किलो N नत्र असते
50× 0.32 =16 किलो P स्पुरद असते
50 × 0.16 =8 किलो K पालाश असते.

3️⃣ सरळ खतात खालील प्रमाणे अन्नद्रव्य असतात.
Urea 46% म्हणजे 50 किलोच्या पोत्यात 23 किलो नत्र असतो.
म्हणजेच 50× 0.46 = 23.

4️⃣ SSP सिंगल सुपर फोस्पेट 16% म्हणजे 50 किलोच्या पोत्यात 8 किलो स्पुरद असते.

5️⃣ MOP म्यूरेट ऑफ पोटयाँश 60 % म्हणजे 50 किलोच्या पोत्यात 30 किलो पालाश असते.

6️⃣ अलिकडे यूरिया चे पोते हे 45kg चे असल्यामुळे,
45 × 0.46= 20.7 किलो.

7) अश्या प्रकारे आपण खतांचे प्रमाण काढू शकता.

Comments